स्वच्छ भारत अभियानामध्ये सहभागी होण्याबाबतच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासोबतच राज्यात या अभियानाबाबत जनजागृतीसाठी आपला सक्रीय सहभाग देत एशियन कॉलेज येथील प्राचार्य डॉक्टर उपाध्ये यांनी नवा आदर्श निर्माण केला आहे. घन कचरा व्यवस्थापनाबद्दल जागृती वाढवण्यासाठी या उपक्रमाद्वारे दिलेले अल्प योगदानदेखील महाविद्यालयाच्या स्वच्छता सप्ताह निमित्ताने मोठे वर्षाचे मोठे फलित असेल, असा आशावाद या प्रसंगी क्लीन गार्बेज म्यानेजमेंट चे संस्थापक श्री विलास पोकळे नि व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी घन कचरा व्यवस्थापन माहिती घेताना प्लास्टिक चे सु व्यवस्थापन आणि त्याच बरोबर ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याचे महत्व समजून घेतले. या अभियानात ५० विद्यार्थी तसेच ५ प्राध्यापकांनी सहभाग घेतला.




No comments:
Post a Comment